Chinchwad : करोडपती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांची उपायुक्तांकडून चौकशी

एमपीसी न्यूज – एका दिवसात करोडपती झालेले(Chinchwad) पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. झेंडे यांनी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींची रक्कम जिंकली. त्याबाबत आता चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस (Chinchwad)उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींचे बक्षीस मिळाले. त्यानंतर याबाबत साधक बाधक चर्चा सुरू झाली. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी अशा प्रकारे पैसे लाऊन खेळ खेळला. असल्याने त्याबाबत काही जणांनी त्यावर आक्षेप घेतले.

Pimpri : ‘त्या’ दुकानांचे महापालिका सर्वेक्षण करणार

आता या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडून याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाच्या प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.