Pimpri : ‘त्या’ दुकानांचे महापालिका सर्वेक्षण करणार

एमपीसी न्यूज – खाली दुकान आणि दुकानच्या वरती (Pimpri) राहत असलेल्या दुकानांचे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणाचे काम बचत गटातील महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

चिमणाराव चौधरी यांचे पूर्णानगर येथील टेल्को रोडला भाड्याच्या गाळ्यात सचिन हार्डवेअर ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिकचे दुकान आहे. चौधरी कुटुंबिय दुकानाच्या वर पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानाच्या वरच्या माळ्यावर झोपलेल्या चौधरी कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची 29 ऑगस्ट रोजी घटना घडली होती. यामुळे शहरातील “निचे दुकान और उपर मकान”चा प्रश्‍न चर्चेत आला आहे.

Pimpri : ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा – अमोल थोरात

आयुक्त सिंह म्हणाले, मालमत्ता कर संलकन व कर आकारणी (Pimpri) विभागाच्या बिलांचे आणि सर्वेक्षणाचे महिला बचत गटांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे आता शहरातील व्यावसायिक दुकानांचेही सर्वेक्षण महिला बचत गटामार्फत करण्यात येणार आहे. एका दुकानासाठी महापालिका महिलांना 45 रूपये देण्यात येणार आहे. यामुळे गाळ्यांचा व्यावसायिक आणि राहण्यासाठी किती ठिकाणी वापर होत आहे, याची माहिती मिळणार आहे.

शहरातील अतिक्रमणांवरील कारवाई थंडावल्याबद्दल बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, सध्या सण, उत्सावाचा काळ आहे. त्यामुळे पोलिसांनी विनंती केल्यामुळे कारवाई थांबवली आहे. उत्सव संपल्यानंतर ज्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, असे रस्ते, चौक पाहून अतिक्रमण कारवाई करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.