Wakad : वेळीच मदत मिळाल्याने वृद्धाचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज – वाकड येथील मुळा नदीपात्रात पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूपरित्या बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच मदत केल्याने वृद्धाचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) दुपारी वाकड (Wakad) ब्रीज येथे घडली.

Pimpri : तांत्रिक कौशल्याबरोबर सॉफ्ट स्किल्सचेही शिक्षण गरजेचे; आयुक्त शेखर सिंह

राजा हरिभाऊ भोसले (वय 55, रा. वाकड) असे सुटका केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिनेश देशमुख यांनी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास अग्निशमन दलास वर्दी दिली. त्यानुसार रहाटणी अग्निशमन उप केंद्रातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी अनिल वाघ, विष्णू बुधवंत आणि साईनाथ मिसाळ हे सुमारे 12 फूट खाली नदीपात्रात उतरले.

त्यांनी चादरीची झोळी करून त्यात राजा भोसले यांना ठेवले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने वर काढले. राजा भोसले हे लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना फीट आल्याने ते नदीपात्रात पडले. मात्र वेळीच अग्निशमन दलाची मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.