Pimpri : तांत्रिक कौशल्याबरोबर सॉफ्ट स्किल्सचेही शिक्षण गरजेचे; आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – शहरातील उद्योगांनी युवकांना सक्रियपणे प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, त्यांना चांगल्या संधी मिळतील याची खात्री करण्यासाठी आणि कंपनीतील उच्च पदांवर त्यांना काम करता यावे यासाठी शहरातील उद्योगांना युवकांच्या प्रशिक्षणासाठी औद्योगिक शिक्षण संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले. युवकांना घडविण्यासाठी केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे तर सॉफ्ट स्किल्सचेही शिक्षण देणेही तितकेच महत्वाचे असून संवाद कौशल्य, संघटन कौशल्य याचाही सहभाग असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Khed : चुलता पुतण्याच्या मारहाणीत चुलत्याचा मृत्यू

पिंपरी (Pimpri) चिंचवड महानगरपालिका व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी यांच्या वतीने शहरातील आणि हद्दीलगतच्या विविध औद्योगिक कंपन्यांसमवेत “भारतीय उद्योगांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करणारे आयटीआय ट्रेड ओळखणे” या विषयावर वाकड येथील हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

ही कार्यशाळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली व विविध औद्योगिक आस्थापनांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडली. औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या विस्तारीकरण व सुधारणा प्रक्रियेत विविध औद्योगिक आस्थापनांना समावून घेणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, उप आयुक्त रविकिरण घोडके, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे डायरेक्टर एस. एच. कोपर्डेकर, टाटा मोटर्सचे सुशील वारंग, सॅन्डविक टुलिंगचे सचिन पाटील, बॉश रेक्स्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मिलिंद तावरे, फोर्ब्स मार्शलचे एचव्ही सिंग आणि प्रसाद वैद्य, महिंद्राचे मंगेश गुंजल आणि स्मिता पानसकर, सँडविक कोरोमंट इंडियाच्या रोशनी आचार्य, जॅक्वारचे पांडुरंग हेलगे आणि क्रिष्णा फरटाले, एस.के.एफ इंडिया लिमिटेडचे मयूर देशमुख, लुकास टीव्हीएस लिमीटेडचे गजानन पाटील, गॅलेक्सी टूलिंगचे सचिन पाटील, दिलीप अराग, संजय मोरे आणि पल्लवी जैन, मॉड्यूलर आणि सॉलिड वुड फर्निचरचे फिरदौस चिंधी, फटेक प्रोडक्ट्स आणि सर्विसेसचे अभिजित बीएम आणि अनुप कुमार, सेफेटेक प्रोडक्ट्स ऍन्ड सर्विसेसचे शहजाद अली, कॅडमॅक्स सोल्युशन्सचे जयतीर्थ यक्कुंडी, ए. आय. आय. पी. एल टेकचे राजेंद्र पिल्लई, सेफटेक प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेसचे अभिजित बी एम, लुमॅक्स इंडस्ट्रीजचे राहुल तायडे, मार्कक्राफ्ट यूएसएचे आर के पिल्लई, श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया लिमीटेडचे सेहुल शाह, एन्ड्रेस हौसरचे कार्डिडेड लोबो, ख्रिस्ती शार्पलाइन टेक्निकल ट्रेनिंगचे डॉ. नितीन सप्रे, फेदरलाइट कलेक्शनचे शौनक दिवेकर टर्क इंडिया ऑटोमेशनचे गोपाल कृष्णन एस के, राजा कन्स्ट्रक्शन कंपनीचे मधुर डागा, फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आणि फेदरलाइटचे नितीन मुकुंद घाग, कायनेटिक कम्युनिकेशनचे विशाल पाटील, द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्सचे पराग जोशी आणि आनंद जाधव, कॅडमॅक्स सोल्युशन्सच्या अश्विनी सिरगापूर, कॅडमॅक्स सोल्युशन्सच्या सुधा राणी, ग्राम तरंगच्या रमेश रासकर आणि मनीष उमाडे, थरमॅक्सचे आबिद इनामदार, एंड्रेस हौसर प्रायव्हेट लिमिटेडचे आशिष बुले, मोगोरा कॉस्मिकचे अतुल धर्माधिकारी, आय. ई. सी. एअर टुल्सचे हर्षवर्धन गुणे, एम. सी. सी. आयचे एस.एच. कोपर्डेकर, थर्मॅक्स लिमिटेडचे सुहास गर्दे, अल्टेन इंडिया प्रायव्हेट लिमीटेडचे गौरांग सोनी, डी. आय व्हाय गुरूचे कुलदीप प्रजापती, एमरसन प्रोसेस मॅनेजमेंट प्रथमेश गोसावी, बी. एम. डब्लुचे सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, भारतीय उद्योगातील भविष्यातील मागण्या ओळखून पिंपरी चिंचवड शहरात औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित असते. शहरातील उद्योगवाढीचा फायदा शहराला नक्कीच झाला आहे आणि राज्यातच नव्हे तर देशात अस्तित्वात असलेल्या सर्वोत्तम औद्योगिक कंपन्या या शहरात आहेत, याचा महापालिकेस अभिमान आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पिंपरी (Pimpri) चिंचवड शहरात मोरवाडी आणि कासारवाडी या दोन सुस्‍थापित औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या संस्था व्यावसायिक प्रशिक्षण आणि आवश्यक कौशल्ये प्रदान करित आहेत ज्या युवकांना स्थानिक उद्योगांमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सक्षम करत आहेत. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध १८ ट्रेड्सचे प्रशिक्षण दिले जाते. उद्योगांमधील विविध क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य यांच्यामधील समन्वयाचे काम महापालिकेने केले आहे, हा समन्वय राखण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असून असंख्य युवकांना त्यांच्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार केले आहे.

विविध क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांची वाढती मागणी पाहता विविध औद्योगिक अस्थापना वास्तविक जगातील गरजांनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमाला आकार देण्यास मदत करू शकतात. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था केवळ सर्वसमावेशकच नाही तर उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये आणि अधिक जबाबदारीच्या पदांवर संधी देखील प्रदान करते. युवकांना घडविण्यासाठी केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे तर सॉफ्ट स्किल्सचेही शिक्षण देणेही तितकेच महत्वाचे असून संवाद कौशल्य, संघटन कौशल्य याचाही सहभाग असणे गरजेचे आहे.

उद्योग क्षेत्रात महिला सक्षमीकरणावर तसेच पुरुषप्रधान व्यवसायांमध्ये महिलांना भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यावर आणि औद्योगिक शिक्षण संस्थामध्ये सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण शिक्षण वातावरण निर्माण करण्यावर महापालिका भर देत आहे. युवकांना कौशल्याने सुसज्ज करणे तसेच त्यांना भविष्यात विविध संधी उपलब्ध करून देणे ही शहरातील उद्योगांची जबाबदारी आहे, यामुळे युवकांना संधी मिळून शहरात समृद्धीचे वातावरण तयार होऊ शकते असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी, सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच शिल्पा शशिधरण यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.