Khed : चुलता पुतण्याच्या मारहाणीत चुलत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चुलत चुलता व पुतण्या यांच्या मारहाणीत चुलत्याचा खाली पडून डोक्याला मार लागल्याने चुलत्याचा मृत्यू झाला आहे. हि घटना 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी खेड (Khed) येथील कोरेगाव येथे घडली आहे.

Hinjwadi : टास्कच्या बहाण्याने महिलेची 34 लाखाची फसवणूक

याप्रकरणी मच्छिंद्र मारुती गावडे (वय 47 रा. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.31) फिर्याद दिली आहे. यावरून संजय बबन गावडे (वय 32 रा. कोरेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये साहेबराव मारुती गावडे (वय 42) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत पुतण्या आरोपी संजय याने काही एक कारण नसताना साहेबराव यांच्यासी वाद घालण्यास सुरुवात केला. यात त्याने कानाखाली मारून साहेबराव गावडे यांना ढकलून दिले. त्यात ते सिमेंट रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्या अंतर्गत रक्तस्त्राव झाला व ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.