Wakad : गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना (Wakad) अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास म्हातोबानगर झोपडपट्टी वाकड येथे करण्यात आली.

 

 

Pimpri : जागा विक्रीच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

 

 

संकेत अशोक थोरात (वय 19, रा. येवले चाळ वाकड) आणि एक महिला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार सुहास पाटोळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी महिलेच्या घरात छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांना दोन किलो 375 ग्रॅम वजनाचा बारा हजार (Wakad)रुपयांचा गांजा आढळून आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.