Wardha : रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

वर्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रामदास तडस अडचणीत, पूजा तडस अपक्ष निवडणूक लढवतील अशी चर्चा

एमपीसी न्यूज : माझ्यावर रामदास तडस (Wardha) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप अन्याय केला आहे. माझे सासरे आणि त्यांच्या मुलाने माझा छळ केला असून माझ्याकडे मुलाच्या बापाचे पुरावे मागितले असा गंभीर आरोप वर्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रामदास तडस व त्यांच्या कुटुंबीयावर सून पूजा तडस यांनी आज (दि.11) रोजी  केला.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे  (उबाठा गट) यांनी आज पूजा तडस यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या आयोजित पत्रकार परिषदेत पूजा तडस म्हणाल्या, रामदास तडस आणि त्यांच्या मुलाने माझा प्रचंड प्रमाणात छळ केला आहे. माझ्याकडे मुलाच्या बापाचे पुरावे मागितले .रामदास तडस यांच्या मुलाने (पंकज तडस) यांनी पोलिसापासून कारवाई होऊ नये  म्हणून माझ्याशी लग्न केले. मला एका सदनिकेत ठेवून मला एक उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आले.  मी ज्या सदनिकेत राहत होते ती सदनिका विकून टाकली आणि ज्याने  माझी राहती सदनिका विकत घेतली त्यांनी मला घराबाहेर काढले.  मला एक मूल असून माझ्या पालनपोषणाचा प्रश्न उभा राहिला आहे.

Chakan : पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांवर चाकूने वार, आरोपीला अटक

शिवसेनेच्या उपनेत्या (उबाठा गट) सुषमा अंधारे यांनी हा प्रकार फार चमत्कारिक आणि भयंकर आहे .एका छोट्या बाळाला घेऊन ही माय माऊली न्याय मागत आहे. आता तिला न्याय मिळेल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

रामदास तडस यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला आणि माझ्या कुटुंबियांना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र आहे. माझ्या मुलाने आणि पूजाने परस्पर लग्न केले. मला लग्नाला पण बोलावले नव्हते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी ह्या विषयावर बोलू शकत नाही. पूजा आमच्याकडे राहत नाही. तिने तिच्या नवऱ्याजवळ राहावे. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे हा मुद्दा विरोधकांनी पूजाचा हात धरून बाहेर काढला आहे असे रामदास तडस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.