Pune : लोककलेच्या सादरीकरणातून कलाकारांनी केले सामाजिक प्रबोधन

एमपीसी न्यूज – गवळण..कोळीनृत्य… भारुड…पोवाडा…गोंधळ अशा पारंपरिक (Pune)समृद्ध लोककलेचे अतिशय सुंदर सादरीकरण करीत लोककलेचे विविध रंग कलाकारांनी उलगडले. कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करीत अगदी सहजरीत्या लोकांचे प्रबोधन केले. समग्र लोककलेचा प्रबोधनाचा समृद्ध वारसा रसिकांना यानिमित्ताने पहायला मिळाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या(Pune) 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महोत्सवाचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात केले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलावंत प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकाऱ्यांनी  “महाराष्ट्राचा लोकमेळा“ हा लोककलांनी समृद्ध कार्यक्रम सादर केला.

स्त्रियांचा सन्मान करा…आई वडिलांचे पूजन करा…आपला मतदानाचा हक्क बजावा.. मुलासोबत मुलींना देखील चांगले शिक्षण द्या असे समाजाला जागरुक करणारे संदेश आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून दिले. कदमराई गोंधळाच्या गणाने गणेशाला वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कवी हैबती यांचे कवन सादर झाले.

‘देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया’ या समूहनृत्यांने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ‘मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून’, ‘देवा वाचून सुनं गं, झुरतय माझं मन’ हे गीत सादर करीत आई-वडिलांचा सन्मान  करा त्यांना वृद्धाश्रमात ठेऊ नका असे उपस्थितांना सांगितले. ‘तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे’… ‘नवरी नटली आज बाई सुपारी फुटली’….’माझी मैना गावाकडे राहिली’ या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

Ravet : गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

13 एप्रिल पर्यंत हा दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 यावेळेत संगीत महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.