Weather Report : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तर दक्षिण महाराष्ट्र – गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, पुणे वेधशाळेने वर्तविण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : मालवण 7, पेडेणे, शहापूर 6 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), कुडाळ, वेंगुर्ला 5 प्रत्येकी, म्हापसा 4, देवगड, मडगाव, मार्मगोवा 3 प्रत्येकी, कानकोना, दोडामार्ग, माथेरान, पालघर, केपे, रामेश्वर(कृषी), संगमेश्वर, देवरूख , सावंतवाडी 2 प्रत्येकी, हरनाई, कणकवली, लांजा, मंडणगड, मुंबई (कुलाबा), मुरबाड, राजापूर, रत्नागिरी, वैभववाडी, वालपोई, वडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : आटपाडी 14, माळशिरस 10, चाळीसगाव, दहीगाव एफएमओ, खटाव वडूज, ओझरखेडा एफएमओ, राहुरी 3 प्रत्येकी, भुसावळ, दहिवाडी माण, गगनबावडा, हातकणंगले, नेवासा, पाथर्डी, शेवगाव 2 प्रत्येकी, बार्शी, जामनेर, कोपरगाव, कोरेगाव, पन्हाळा, फलटण, रहाटा, सांगोला 1 प्रत्येकी.

मराठवाडा : औसा 13, देग्लूर, मंजल गाव, उस्मानाबाद, परंडा, रेणापूर 5 प्रत्येकी, अंबेजोगाई, बिलोली, चाकूर, परभणी 3 प्रत्येकी, बीड, धारूर, गेवराई, पैठण, सेलू, सोनपेठ 2 प्रत्येकी, अंबड, अर्धापूर, भूम, देवणी, गंगापूर , कैज, लातूर, मानवत, निलंगा, पाथरी, तुळजापूर, वैजापूर, वडावणी, वाशी 1 प्रत्येकी.

विदर्भ : भद्रावती, देसाईगंज, मारेगाव 3 प्रत्येकी, चमोर्शी, वरोरा 2 प्रत्येकी, अहीरी, आमगाव, आर्मोरी, आर्वी, चंद्रपूर, चांदूर, चिखली, देवळी, धानोरा, गोंदिया, हिंगणघाट, कुरखेडा, महागाव, मुल, सडक अर्जुनी, सालेकसा, शिंदेवाही, तीर , वणी 1 प्रत्येकी.

घाटमाथा: ताम्हिणी 1.

पुढील हवामानाचा अंदाज:

19-20 सप्टेंबर : कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

21 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 सप्टेंबर : कोकण-गोवा व विदर्भात बहतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.