Chinchwad : फुटबॉल स्पर्धेमध्ये विझार्डस संघाने पटकाविले विजेतेपद

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील रस्टन कॉलनी मित्र मंडळाच्यावतीने  11 व्या स्वातंत्र्यता चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती.  स्पर्धेमध्ये तीस संघांनी भाग घेतला. तीन दिवसाच्या नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धे मध्ये विझार्डस संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला रोख पंधरा हजार रुपये व स्वातंत्र्यता चषक करंडक देण्यात आला.

स्पर्धेचे उदघाटन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्विनी  चिंचवडे व रस्टन कॉलनीचे उपसभापती सुभाष मालुसरे  आदी उपस्थित होते.

स्निगमय संघाने उपविजेतेपद पटकाविले. त्यांना रोख दहा हजार रुपये व करंडक देण्यात आला तसेच स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुमित भंडारी व उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गुड्डू डोलाई यास गौरविण्यात आले.

स्पर्धेचे संयोजन मंडळाचे आधारस्तंभ संतोष सौंदणकर यांनी केले. बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन विवेक जोशी यांनी केले  आभार  प्रशांत शेनॉय यांनी मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते रोहित शेळके, कुणाल साटलकर, विवेक जोशी, अथर्व माने, चेतन जोशी, रोहन शेळके, आकाश हगीर, ऋषिकेश कांबळे, शुभम महाजन आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.