Dapodi : पेटवून घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात महिलेने स्वतःला पेटवून घेतले. घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही घटना फुगेवाडी (Dapodi) येथे बुधवारी (दि. 13) पहाटे घडली.

Chinchwad : फॉरेक्स ट्रेडिंग नको रे बाबा! शहरातून 30 कोटी रुपये फॉरेक्स ट्रेडिंगमधून विदेशात

अर्चना अजय खरात (वय 40, रा. फुगेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अर्चना यांनी काडीपेटीने स्वतःच्या अंगावरील कपडे पेटवून घेतले. त्यावेळी त्यांचे पती अजय खरात हे बाहेरच्या खोलीत होते. धूर झाल्याचे जाणवताच त्यांनी आग विझविली. जखमी अर्चना यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर अर्चना यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

अर्चना या मानसिक रूग्ण होत्या. अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला असून ती सासरी असते. तर घटना घडली त्यावेळी 18 वर्षीय मुलगा मामाकडे तळेगाव येथे गेला होता. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.