Today’s Horoscope 14 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 14 September 2023 
वार – गुरुवार
14.09.2023
शुभाशुभ विचार-अमावास्या वर्ज्य.
आज विशेष- पिठोरी अमावस्या.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी- सिंह.
————————————
मेष – ( शुभ रंग- जांभळा )
आज तुम्ही काहीसे लहरीपणा ने वागाल. हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

वृषभ (शुभ रंग- केशरी )
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्ती कडे ही लक्ष पुरवावे लागेल.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासचे प्रवासात काही नव्या फायदेशीर ओळखी होतील.

कर्क (शुभ रंग- क्रीम)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडणार आहेत. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव राहील. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

सिंह (शुभ रंग- हिरवा )
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मानसिक स्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावीत करेल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)Today’s Horoscope 14 September 2023 
आज कंजूष पणा करून चालणार नाही. काही आवश्यक खर्च करावेच लागणार आहेत. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही तुम्ही आज भारावून जाल. प्रवास कार्य साधक ठरतील.

तूळ ( शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की लाभेल.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशन ची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही भर द्याल.

धनु- (शुभ रंग- गुलाबी)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळीही आज गरजे पुरती श्रद्धाळू होणार आहेत.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )
जे चाललंय ते बरं चाललंय म्हणावे लागेल. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह करू नका. धाडसाची कामे आज टाळली तर बरे. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात मध्यस्थी कराल.

मीन -(शुभ रंग – लाल)
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जोपासतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. आज गृह सौख्याचा दिवस.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Dapodi : पेटवून घेत महिलेची आत्महत्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.