Burglary gang arrested : मांडवगण फराटा येथे मध्यरात्री दरोडाच्या तयारीत आलेल्या सहा दरोडेखोरांना अटक

एमपीसी न्यूज: यवत पोलिसांनी मांडवगण फराटा येथे मध्यरात्री दरोडाच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे.(Burglary gang arrested) तसेच त्यांच्याकडून एकूण 13 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.

आज मंगळवारी 6 सप्टेंबरला पहाटे 3 वा. पोलीस नाईक सोनवणे व पोलीस नाईक कापरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम दरोडाच्या तयारीत केडगाव चौफुला येथे एकत्र जमलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ती माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोसई नागरगोजे यांना कळविली. त्यानंतर लगेच केडगाव चौफुला येथे जाऊन व्युहरचना आखुन काही इसम दरोडाच्या तयारीत असताना एकूण सहा इसमांना जागेवरच पकडण्यात आले.

या इसमांच्या ताब्यात असलेली एक एक्टिवा मोटरसायकल व तिच्या डिक्की मध्ये असलेला एक कोयता, एक मोटर सायकल, एक लोखंडी कटावणी, एक पक्कड, एक मिरची पावडरची पूड व एक बॅटरी एकूण 1 लाख 15 हजार 300 किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलेे आहे.

Bhosari Festival 2022 : खासदार अमोल कोल्हे यांनी केले अध्यक्ष नितीन लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन

त्या इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुनील लोणी वय 22 वर्षे व सौरभ शिंदे वय 24 वर्षे, दोघेही रा. चिंचवड बालाजी नगर, तालुका हवेली,(Burglary gang arrested) जिल्हा पुणे, राहुल आगम, वय 21 वर्षे, रा. दिघी आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे, अभिषेक चौधरी वय 22 वर्षे व राहुल चव्हाण, दोघेही रा. केडगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे, विकास सानप, वय 19 वर्षे, रा. फरांडे नगर दिघी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भादवि कलम 399 अन्वये दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे गुन्ह्याचे बाबत अधिक तपास केला असता त्यांनी मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे 31 ऑगस्टला रात्री तेरा घरफोड्या केल्याची कबुली  दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे हे करीत आहेत.(Burglary gang arrested) ही कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक,  राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस नाईक गणेश सोनवणे, पोलीस नाईक विकास कापरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भापकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गडदे, पोलीस मित्र राजेंद्र अडागळे, रामा पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.