Pune ACB : चाकण वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कॉन्स्टेबल सह मदतनीसाला लाच घेताना पकडले

एमपीसी न्यूज : चाकण वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कॉन्स्टेबल सह मदतनीसाला सात हजाराची लाच घेताना पकडले असल्याची माहिती, (Pune ACB) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चाकण वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने एका मोटरसायकल स्वाराला वाहतूक नियम तोडल्यामुळे आज संध्याकाळी 5 ते 6 वा.च्या दरम्यान पकडले.(Pune ACB) या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने व त्याच्या मदतनीसाने या मोटरसायकलस्वाराकडून कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे मोटरसायकल स्वाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

Burglary gang arrested : मांडवगण फराटा येथे मध्यरात्री दरोडाच्या तयारीत आलेल्या सहा दरोडेखोरांना अटक

तडजोडीनंतर लाचेची रक्कम कमी करून सात हजार रुपये करण्यात आली.(Pune ACB) ही सात हजार रुपये रक्कम स्वीकारताना ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबल व त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.