Yerwada News : होय राजे आमचेही आहेत… उर्दू शाळेतील मुलींनी रोखाटले शिवराय

एमपीसी न्यूज –  आसपास सुरु असणाऱ्या धार्मिक राजकारणात कोणी धर्मापलीकडे जाऊन जगत असेल तर नक्कीच आत्ताच्या काळात ही खूप सकारात्मक गोष्ट मानावी लागले. असेच चित्र माध्यमांमध्ये काम करणारे छायाचित्रकार संदिप भागवत यांच्या नजरेज पडले व ते सकारात्मक चित्र टिपून घेण्याचा मोह ते ही रोखू शकले नाहीत. चित्र तसे सामान्यच होते शाळेतील काही मुली शिवजयंतीनिमीत्त शिवरायांचे चित्र ( Yerwada News ) रेखाटत होत्या मात्र त्या मुली होत्या येरवडा येथील नागपूरचाळ येथील उर्दू शाळोतील मुली.

 

समोर उर्दू भाषेतील पाठ्यपुस्तक ठेऊन त्यातील शिवरायांचे चित्र रेखाटत बसलेली ती विद्यार्थीनी तिच्या वागण्यातून बरच काही सांगून जात होती. शिवराय कोण्या एका जाती धर्माचे नव्हते, त्यांचे स्वराज्य कोण्या एका धर्माचे नव्हते त्यात सर्वांना समान अधिकार होता कारण स्वराज्याच्या निर्मीतीत सर्वांचाच वाटा होता.

 

Alandi News : राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी संस्कृती वाघेची निवड

त्या मुलीच्या चित्र एकत गोष्ट सांगत होते की होय शिवराय आमचेही आहेत… त्यांच्या महाराष्ट्रात आम्ही ही आहोत. बाहेर धार्मिक गोष्टीवरून राजकीय युद्ध सुरू असताना नवीन तयार होणारी पिढी मात्र वेगळेच चित्र रंगवू पहात आहे जे की भविष्यासाठी खूप सकारात्मक आहे.

याविषयी बोलताना भागवत म्हणाले की, मी सहज कुतुहल म्हणून उर्दू शाळेत गेलो होता. पण ते चित्र पाहून माझे जाणे सार्थक झाले. कारण बाहेर सतत वाद, नकारात्मकता असताना नवीन पिढी मात्र त्याच्या कोसो दूर असून ते वेगळच काही तरी घडवू पहात आहेत.

मुळात आपल्या लहानपणी जी समानता मी अनुभवली होती ती या मुलांना कोण सांगणार असा प्रश्न मनात असताना त्यामुलीने स्वतःच मला उत्तर दिले जे खूप सकारात्मक होते. आता या पिढीची काळजी नाही वाटत.

हिंदू-मुस्लीमच्या पलीकडे जाऊन शिवरायांनी स्वराज्य़ स्थापन केले म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वराज्य आजही सर्वांच्या मनात जिवंत आहे. राजकारणाच्या बळी न पडता अशीच ( Yerwada News ) पुढची पिढी भविष्य साकारत राहिली तर भारत कायम एकसंध राहील यात तिळमात्र शंका नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.