Flower market : झेंडूने खाल्ला भाव ; 100 ते 150 रुपये किलो दर

एमपीसी न्यूज : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूने चांगलाच भाव खाल्ला. किरकोळ बाजारात 100 ते 150 रुपये किलो दर मिळाला. (Flower market) नवीन जुन्या गाड्या, घर सजावट, ऑफिस आकर्षण करण्यासाठी झेंडूचा वापर करण्यात येतात. पिवळ्या धमक झेंडू फुलांनी वातावरण ढवळून निघाले होते. सोबतच आपट्याची पाने आणि आंब्याची पाने 20 ते 30 दर रुपये दरांनी विक्रीला होते.

Stree shakticha jagar : शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना दिले संस्कारांचे अमूल्य धडे

मार्केटयार्ड, स्वारगेट, सिहगड रोड, कर्वे रोड, ऐनडीऐ रोड, वारजे – माळवाडी, बाणेर, बावधन, बालेवाडी, शिवाजीनगर, नगर रोडवर किरकोळ विक्रेत्यांनी झेंडूचा फुलांची गंजी लावून जोरात विक्री केली. कालपासूनच ही फुले विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.(Flower market) वॉशिंग सेंटवर गाड्या धुण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 2 वर्षांच्या कोरोना परिस्थिती नंतर बाजारपेठ फुलली होती. झेंडूची फुले खरेदीसाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले, अशी माहिती प्रकाश दांगट यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.