Pimpri : नगरसेवकांचा आयुक्तांना घेराव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या नवीन कामाचा बोजवारा उडाला आहे. शहरात सर्वत्र कच-याचे ढिग साचल्याचा आरोप करत विरोक्षी पक्षांच्या नगरसेवकांनी आज (बुधवारी)महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेराव घातला. परंतु, नगरसेवकांनी हसत-खेळत घेराव घातल्याने आंदोलनाचे गांभीर्य कमी झाले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे, माजी नगरसेवक मारुती भापकर, युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्‍तांच्या दालनात धाव घेतली. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. पावसाळा सुरु झाल्याने, संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्‍यता आहे. त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नामदेव ढाके उपस्थित होते.

शहारातील कचरा उचलण्याच्या नवीन निविदांनुसार कामाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या कामाचा बोजवारा उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. शहराची दोन भागांत विभागणी करून, त्यानुसार कचरा उचलण्याचा आठ वर्षांचा ठेका दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. एका ठेकेदाराकडे वाहने उपलब्ध नसल्याने कचरा उचलण्याचे काम दोन महिने उशिराने सुरु झाले आहे. 1 जुलै पासून सुरु झालेल्या या कामाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. आयुक्तांनी दोन दिवसात कच-याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.