उरळी कांचन जवळ मिनी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 11 प्रवासी ठार

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू


एमपीसी न्यूज – पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन पोलिसांच्या हद्दीत इनामदार वस्ती येथे टेम्पो ट्रॅव्हल्स मिनी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला. महामार्गावर रानडुक्कर बसच्या आडवं आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
तर या 11 प्रवाशांपैकी तिघेही एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंडहून अक्कलकोटला जाणारी जयश्री ट्रॅव्हल्सची मिनी बस (MH43 H7571) ट्रकला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मृतांची नावे : ज्योती काळे, रेवती चव्हाण, शैलजा पंडित, सुलभा अवचट, योगिता चव्हाण, प्रदीप अवचट, जगदीश पंडित, जयवंत चव्हाण, योगेश लोखंडे, विजय काळे आणि टेम्पो ट्रॅव्हलचा चालक केतन पवार यांचा मृतात समावेश आहे.

अपघातात मुलुंड येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू 

 

यात आई-वडील आणि मुलगी या तिघांचा मृत्यू झाला आहे. जयवंत च्हाण (वय 48), योगिता चव्हाण (वय 44), रेवती चव्हाण (14 वर्षे) अशी तिघांची नावे आहेत. मुलगी रेवती चव्हाण ही आठवीत शिकत होती. तिचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे.

चव्हाण कुटुंबीय हे मूळचे बत्तीस शिराळ्याचे होते. त्यांच्या मुलुंड इथे इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. रेवती चव्हाण ही आठवीत शिकत होती. तिचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे. जयवंत आणि योगिता यांचेही नेत्रदान करायचे होते. परंतु ते होऊ शकले नाही, अशी माहिती चव्हाण यांचे नातेवाईक  बाळासाहेब गायकवाड यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.