Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद (Video)

एमपीसी न्यूज : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला करण्यात आला.

शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे.

Pune : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही : चंद्रकांत पाटील

नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.