PMPML : कोथरूड, सांगवी गाव व पिंपळेगुरव येथे शुक्रवार पासून नव्याने पीएमपीएमएल बससेवा सुरू

एमपीसी न्यूज – प्रवाश्यांच्या मागणी नुसार व वाढत्या गर्दीमुळे पीएमपीएमएल कडून बसमार्ग क्र. 77 कोथरूड स्टॅण्ड ते हिंजवडी माण फेज 3 बसमार्ग क्र. 310 –(PMPML) सांगवी गाव ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे या दोन मार्गांवर शुक्रवार (दि.28) पासून गर्दीच्या वेळेत नव्याने बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलतर्फे देण्यात आली आहे.

Pune : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही : चंद्रकांत पाटील

बसक्रमांक व तपशील मार्ग पुढील प्रमाणे

1)  77 कोथरूड स्टॅण्ड ते हिंजवडी माण फेज 3 कोथरूड डेपो, चांदणी चौक, वाकड ब्रिज बाणेर

2) 310 सांगवी गाव ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे पिंपळेगुरव, वाकड, बालेवाडी, सुसगाव पिंपरी

तरी नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या या दोन्ही (PMPML) बस मार्गावर बससेवेचा लाभ प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरीक, रूग्ण यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.