Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा – राहुल सोलापूरकर

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन चरित्र हे (Nigdi) धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा समान होते. त्यांच्या स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म स्वनिष्ठा या विचारांशी समर्पित होवून त्याप्रमाणे आचरण केले गेले पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निगडीतील मॉडर्न शैक्षणिक संकुलात आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. अरविंद पांडे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, नियामक मंडळ सदस्य दीपक मराठे उपस्थित होते.

सोलापूरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपण, प्रचंड बुद्धीमत्ता, वाचन, बालवयातच काव्य साहित्य रचना, त्यांचे संघटन व कार्य यावर प्रकाश टाकला. हुतात्मा चाफेकर बंधूंचे बलिदान व काळकर्ते शिवराम हरी परांजपे यांच्याकडून प्रेरणा घेवून सावरकरांनी स्वतःला स्वातंत्र्ययुद्धात समर्पित केले. सशस्त्र क्रांतीची शपथ घेवून त्यांनी पुढे अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. त्यांचा 1857 चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सर्वार्थाने प्रेरणादायी ठरला.

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

प्रा. निकिता गायकवाड यांनी ईशस्तवन सादर केले. नियामक मंडळ सदस्या (Nigdi) मृगजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रोहित गुरव यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कुलकर्णी, वंदना पांडे यांनी वक्त्यांचा व पाहुण्यांचा परिचय करून दिला. लिना पगारे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.