Chinchwad : आऊट डोअर कंट्रोल पॅनेलची चोरी

एमपीसी न्यूज – गोडाऊनच्या बाहेरील बाजूला लावलेले (Chinchwad) आऊट डोअर कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 20 फेब्रुवारी ते 13 एप्रिल या कालावधीत अजंठानगर चिंचवड येथील गिरी सिमेंट गोडाऊनच्या इमारतीत घडली.

अक्षय अनिल दुर्गाडे (वय 27, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMPML : कोथरूड, सांगवी गाव व पिंपळेगुरव येथे शुक्रवार पासून नव्याने पीएमपीएमएल बससेवा सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गिरी सिमेंट गोडाऊनमध्ये काम करतात. गोडाऊनच्या दरवाजाला बाहेरील बाजूला लावलेले 56 हजार 479 रुपये किमतीचे (Chinchwad) आऊट डोअर कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.