Pimpri : स्टार स्पोर्टस् क्लबने दिला पूरग्रस्तांना आधार; 450 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड हानी झाली आहे. फुगेवाडीतील स्टार स्पोर्टस् क्लब, हेमंत फुगे आणि फुगेवाडी ग्रामस्त यांच्यावतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सुमारे 450 कुटुंबियांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

हेमंत फुगे यांच्या पुढाकारातून ‘फाटलेल्या आभाळाला शिवता येत नाही, पण उद्धवस्त झालेल्या संसारांना आधार देऊ येऊ या’ या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्क साहित्य देण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद देत मदत केली.

यामध्ये औषधे, चपाती, शेंदगाणे चटणी, लोणचे, शुद्ध पाणी यांसह अन्य जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या. हेमंत फुगे यांनी ही मदत कोल्हापूर जिल्ह्यातील पुराने बाधित झालेल्या नागरिकांना दिली. 450 कुटुबियांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी फुगे म्हणाले, कोल्हापूर व सांगली येथील महापुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. सर्व नागरिक आपल्या परिने मदत करत आहेत. आम्ही 450 कुटुबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.