Bhosari : आमदार महेश लांडगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी लांडेवाडी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

भोसरी विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भविष्यातील आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी भोसरीकर देखील सज्ज झाले आहेत. सकाळपासून लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. आमदार महेश लांडगे यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. आपण निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी लांडगे यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.