Bhosari : भोसरी मतदारसंघातील सात व्हीव्हीपॅट मशीन बदलल्या

एमपीसी न्यूज – मतदान सुरु असताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील सात ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदानाचा खोळंबा झाला. मात्र, काही वेळेतच तात्काळ मशीन बदलून मतदान प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आली.

खालील ठिकाणच्या व्हीव्हीपॅट मशीन बदलल्या

# पिंपरी-चिंचवड शाळा क्रमांक 22, च-होली
# सु. ना. बारसे विद्यालय, दिघी रोड, भोसरी
# मंजुरी शाळा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आदर्शनगर, दिघी
# पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा क्रमांक 92, म्हेत्रे वस्ती, नवीन वसाहत
# पिंपरी-चिंचवड महापालिका मुला-मुलींची शाळा क्रमांक 89, कुदळवाडी
# पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा क्रमांक 98, गावठाण तळवडे
# सिद्धेश्वर हायस्कूल इंग्लिश मिडीयम इमारत क्रमांक एक, दिघी रोड, भोसरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.