Pimpri : सिनेकलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सिने कलाकारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी मतदान केले.

सकाळी नऊच्या सुमारास अभिनेत्री प्रियांका यादव हिने मतदान केले. त्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मतदानाचा हक्क बजावला.लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व स्तरातील नागरिक पुढे सरसावत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.