पुण्याच्या प्रवीण झेले यांचा 121 दिवस दररोज 21 किलोमीटर अनवाणी धावण्याचा विक्रम

एमपीसी न्यूज – पुण्याचा धावपटू प्रवीण झेले यांनी सलग 121 दिवस दररोज 21 किलोमीटर अनवाणी धावण्याचा विक्रम केला. आज सकाळी (121 व्या दिवशी) सव्वासात वाजता त्यांनी हा विक्रम केला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहिती यावेळी प्रवीण झेले यांनी दिली.

झेले यांनी एक मे रोजी शिर्डी येथून या संकल्पाला सुरवात केली. त्यानंतर ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी 21 किलोमीटर धावत राहिले. आज 121 व्या दिवशी म्हणजेच दिनांक 29 ऑगस्ट रोजी पाषाण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे अंतर धावत त्यांनी हा विक्रम केला. यावेळी त्यांच्यासोबत सुमारे 400 पुणेकरही धावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.