Pune : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या पुण्यात बैठक, सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे संकेत

एमपीसी न्यूज – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची उद्या (30 ऑगस्ट) पुण्यात बैठक होणार असून या बैठकीनंतर ते सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा करणार आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. एकंदरीतच खासदार राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही कमालीचे नाराज होते.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होते. स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.