Pune : शास्त्रीय, लोकनृत्य आणि विशेष मुलांच्या नृत्याने मिळवली वाहवा

भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशनच्या आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवात बहारदार सादरीकरण

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा, भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय नृत्य प्रकारापासून लोकनृत्य सादरीकरणे या महोत्सवात करण्यात आली. 25, 26 जानेवारी रोजी हा महोत्सव भारतीय विद्या भवनमध्ये झाला.

महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर, भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे , प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते.

भरत नाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी, सत्तरिया, हे शास्त्रीय आणि राजस्थानी, संबळपुरी हे लोकनृत्यप्रकार दोन दिवसात सादर केले गेले. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात चेन्नई, बंगळूरू, भुवनेश्वर, जबलपूर, उदयपूर, मुंबई, सिंगापूर, शिलाँग येथील कलाकारांनी कला सादर केली.हा महोत्सव सर्वांसाठी खुला हाेता. सर्वच नृत्यप्रकारांना पुणेकर रसिकांनी चांगली दाद दिली. विशेष दिव्यांग कलाकारांनी कथ्थक तसेच अनेक नृत्यप्रकार सादर करून वाहवा मिळवली.

दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रमोद मराठे यांच्या हस्ते शरदिनी गोळे, प्रभाताई मराठे, माणिक अंबिके या ज्येष्ठ नृत्यगुरुंचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रसिका गुमास्ते, नेहा मुथियान, अस्मिता ठाकूर, शमा पटणी -अधिकारी यांनी संयोजन केले. मिलिंद तुळणकर, मेघना साबडे, अर्चना संजय, प्रज्ञा अगस्थी उपस्थित होते. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. महोत्सव संयोजक रसिका गुमास्ते यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.