Pune : ‘ राष्ट्रीय कीर्तन’ कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन (Pune) आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या ‘ राष्ट्रीय कीर्तन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘राममंदिर ते राष्ट्रमंदिर’असा या कीर्तनाचा विषय होता. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम शुक्रवार,2 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.त्यांना प्रसाद करंबेळकर(तबला), सौ.रेशीम खेडकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 193 वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करुन सर्वांचा सत्कार केला.

Pune : आव्हानांना सामोरे जाताना नव्या संकल्पना, विचारांचा अवलंब करा – सुरेश प्रभू

‘राम राज्यात राजा आणि प्रजा यांच्यात परम मैत्र होते.

राम हाच सर्व संस्कृतीला जोडणारा सेतू आहे.बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी उपासना केली पाहिजे.राष्ट्रोद्धारासाठी ठाम योजना आखली पाहिजे. प्रत्येकानं त्यात योगदान दिले पाहिजे’, असा संदेश चारुदत्त आफळे यांनी या कीर्तनातून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.