Akurdi : आरटीई मार्गदर्शन शिबिरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- मोफत शिक्षण हक्क कायदा 2009 अनुसार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2011 च्या अधिसूचनेनुसार 25 % आरक्षणा अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शालेय प्रवेशाची माहिती देण्यासाठी नगरसेवक जावेद शेख आणि आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ मार्फत आकुर्डी येथे आरटीई मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

यावेळी नगरसेवक जावेद शेख, नबीलाल मुलाणी, विश्वनाथ मोरे, वसंत सोनार सुभाष चौधरी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, इखलास सय्यद, कामगार नेते अशोक माने, रमेश भोरकर, प्रकाश परदेशी आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक जावेद शेख म्हणाले, “या योजनेत प्रवेश मिळाल्यानंतर इयत्ता 8 वी पर्यंत शिक्षण मोफत असून शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी असते. त्यामुळे सर्व जातीधर्माच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा”

यावेळी इखलास सय्यद यांनी पालकांना मार्गदर्शन केले. 25 % आरक्षण म्हणजे काय? कोणकोणते विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात ,वंचित घटक आणि दुर्बल घटक म्हणजे काय? ऑनलाइन अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी ? प्रवेशा साठी कोणती कागदपत्र लागतात,कोणकोणत्या शाळांचा समावेश होतो याची संपूर्ण माहिती दिली

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, जावेद पठाण, अनिल पाटील,अनंत इंगळे, सुयोग काळभोर, निलेश कदम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले तर आभार सुभाष चौधरी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.