RTE : आरटीईच्या 908 जागा रिक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड शहरात (RTE ) मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 2022-23 शैक्षणिक वर्षासाठीचे 25 टक्के आरक्षण जागांसाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेमध्ये 3281 जागांपैकी आत्तापर्यंत 2023 जागांवर प्रवेश निश्चित झालेले आहेत. त्यापैकी अद्याप 908 जागा रिक्त आहेत.

या शिल्लक जागांसाठी प्राध्यान्यक्रमानुसार प्रवेश देण्यात येत आहे. यामध्ये आकुर्डी उन्नत केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या शाळांमध्ये 2185 पैकी 1581 जागांवर प्रवेश देण्यात आला आहे. तर पिंपरी उन्नत केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या 1096 पैकी 792 जागांवर प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरू आहे. तरीही आरटीई प्रवेशाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.

Alandi : पालखी सोहळ्या निमित्त आरोग्य दिंडीचे आयोजन

आरटीई प्रवेशास 12 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली (RTE) आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांना विलंब केल्यामुळे बरेचसे विद्यार्थी प्रवेशास मुकले आहेत. शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या अवधीमध्ये बर्‍याचशा जागांवर प्रवेश निश्चित होईल. मात्र, आरटीईने अद्यापपर्यंत शंभर टक्के प्रवेशाचा कोटा कधीच पूर्ण केलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.