Alandi : पालखी सोहळ्या निमित्त आरोग्य दिंडीचे आयोजन

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (Alandi) सोहळ्या निमित्त 10 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता आळंदी ग्रामीण रुग्णालयाने आरोग्य दिंडीचे आयोजन केले होते. टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात आळंदी शहरातील विविध ठिकाणी या दिंडीने आरोग्य विषयी जनजागृती केली.

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळया दरम्यान नागरिक व वारकऱ्यांना येथून मिळणार मदत

या दिंडीने अनेक वारकरी भाविकांचे लक्ष वेधले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य डी. डी. भोसले पा. ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आषाढी वारी निमित्त 9 जून रोजी आरोग्य सेवा मंडळ, पुणे उपसंचालक राधाकिशन पवार यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालय व बूथची पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.