Pune : विमानतळावरून 16 लाखांचे सोने जप्त; कस्टम अधिका-यांची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून तब्बल 16 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने पकडण्यात आले आहे. कस्टम अधिका-यांनी आज (दि.13) पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई केली.

अब्दूर रहीम खातीब या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दूर हा आज पहाटे साडेचार वाजता स्पाईस जेटच्या फ्लाईटने पुणे विमानतळावर उतरला. यावेळी त्याने कस्टमच्या अधिका-यांची नजर चुकवून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशय आल्याने अधिका-यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याच्याजवळून पेस्ट स्वरुपातील 664.04 ग्राम इतके सोने आढळले. त्यामध्ये 16 लाख 71 हजार 983 रुपयांचे 511.31 ग्राम सोने मिळाले. कस्टम अधिका-यांनी हे सोने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.