तहसील कार्यालयातर्फे गौण खनिजावर कारवाई; 2 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून गौण खनिजावर कारवाई चालू असून यामध्ये 2 लाख 81 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार संजय भोसले यांनी दिली आहे.

सध्या अनधिकृत उत्खनन आणि अनधिकृतपणे त्याची वाहतूक करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा धडका सुरू केला आहे. काल (दि.16) गौण खनिज वाहतूक करणा-या सात वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सांगवी फाटा आणि देहूरोड येथे ही गुरुवारी (दि.10) कारवाई करत 2 लाख 81 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये दोन वाळूची वाहने, पाच खडी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई नायब तहसीलदार संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये वरिष्ठ लिपिक एम. बी. खोमणे, कोतवाल सुजित कांबळे आदींचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.