Chikhali : दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड केली. ही घटना चिखली येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र मोहन डोणगे (वय 39, रा. घरकुल, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हर्षल विंचुरे, आकाश कोळी, अनिकेत रणदिवे, छोट्या उर्फ आकाश आणि अन्य 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र यांचे घरकुल चिखली येथे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून राजेंद्र यांना कोयता, चॉपर, लोखंडी रॉड अशा शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या दुकानाची तोडफोड केली. 4 हजार 700 रुपये जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच दुकानातील सामानाची तोडफोड करून दोन हजारांचे नुकसान केले. राजेंद्र यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या दुकानातही आरोपींनी तोडफोड केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वीस जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, वेळोवेळी पोलीस प्रशासनाला सांगून देखील या गुन्हेगारीवर आळा बसत नसल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. पोलिसांनी या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.