Hinjawadi : बावधनमध्ये घरफोडी करून हिऱ्यांचे दागिने चोरले

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी सव्वासातच्या सुमारास उघडकीस आली.

शीतल समीर पराडकर (वय 44, रा. अपूर्वगड आपार्टमेंट, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पराडकर यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा 6 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.