पदयात्रा आणि रोड शो मुळे शहरात वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीला 5 पाच दिवस शिल्लक असताना. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात येत आहे. कमी वेळेत अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट उमेदवारापर्यंत आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवार सिनेकलावंत, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि रोड शो चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सर्व सामान्य नागरिकाला त्रास सामोरे जावे लागत असून आज पेठ परिसरात पदयात्रांमुळे वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला बसला आहे

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी उमेदवार आम्ही प्रभागाचा विकास करू, रस्ते चांगले प्रकारे तयार केले जातील. वाहतुकीचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल अशी भरमसाठ आश्वासने निवडणुकी दरम्यान देतात. त्याची 100 टक्के अमलबजावणी होत नसल्याचे मागील काही निवडणुकांमधून समोर आले आहे. तसेच उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचाराला प्रत्येक प्रभागात जातात.

त्यावेळी अनेक चौकामध्ये वाहतूक कोंडीचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आज पुणे शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, मंगळवार पेठ आणि दांडेकर पूल या भागात 11 ते 12 दरम्यान वाहतूक कोंडीला नागरिकाना सामोरे जावे लागले. प्रत्येक चौकात लांबच लांब वाहनाच्या रांगा पाहावयास मिळाल्या असून मतदानाचा दिवस जस जसा जवळ येईल त्यानुसार प्रचार मोठ्या प्रमाणात शहरात दिसेल.आणि राजकीय नेत्यांच्या सभा देखील होतील. मात्र, या काळात सर्व सामान्य नागरिकाला या उमेदवारांचा त्रास सहन करावा लागणार हे निश्चित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.