आता ‘न्यू लूक’मधील एमपीसी न्यूज पोर्टल आपल्या सेवेत

एमपीसी न्यूज – आता अधिक आकर्षक ‘न्यू लूक’मधील एमपीसी न्यूज डॉट इन हे  आपले लाडके व विश्वासार्ह न्यूज पोर्टल आपल्या सेवेत नव्या उत्साहाने हजर झाले आहे. नव्या स्वरूपातील या न्यूज पोर्टलचा शुभारंभ नामवंत व्यवस्थापन सल्लागार मनोेहर पारळकर यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) झाले.
 
 

पिंपरीत खराळवाडी येथे एमपीसी न्यूजच्या कार्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे तसेच एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर व सहयोगी संपादक अनिल कातळे उपस्थित होते.

 

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ताज्या घडामोडींच्या सर्वांत जलद आणि विश्वासार्ह बातम्या देणारे न्यूज पोर्टल अशी अल्पावधीत ख्याती मिळविलेले एमपीसी न्यूज डॉट इन हे शहरातील पहिले न्यूज पोर्टल आहे. गेली नऊ वर्षे हे न्यूज पोर्टल आपणास वृत्तसेवा उपलब्ध करून देत आहे. काळानुरूप त्यात वेळोवेळी बदल करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून एमपीसी न्यूज डॉट इनची डिझाईन बदलण्यात आली असून त्याला अधिक आकर्षक व दर्शकांना वापरण्यास अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन मांडणीत मोठी व आकर्षक छायाचित्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच वेळी दर्शकांना त्यांच्या पसंतीच्या  जास्तीत जास्त बातम्या मुख्य पानावर पहायला मिळणार आहेत. आतील पानाची मांडणीही अधिक उठावदार पद्धतीने कऱण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज पोर्टलवरून बातम्या थेट पद्धतीने फेसबुक, ट्विटरसह अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर कऱण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज मोबाईल अॅप तात्पुरते स्थगित

नवीन न्यूज पोर्टलवर विविध सदरांचा मजकूर अपलोड होऊन ते पूर्वपदावर येण्यास अजून काही दिवस लागतील. तोपर्यंत एमपीसी न्यूज मोबाईल अॅप्लिकेशनची सेवा तात्पुरती स्थगित कऱण्यात येत आहे. नवीन न्यूज पोर्टलनुसार मोबाईल अॅपमध्ये काही तांत्रिक बदल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते देखील लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल. तोपर्यंत आमच्या दर्शकांच्या होणा-या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहेत. एमपीसी न्यूज मोबाईल अॅपधारकांनी या काळात mpcnews.in वर जाऊन ताज्या बातम्या वाचवाव्यात, असे आवाहन टीम एमपीसी न्यूजच्या वतीने करण्यात आले आहे.
 

एमपीसी न्यूज डॉट इनचा हा न्यू लूक आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यात आणखी काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्याही आपण आम्हांस जरूर कळवाव्यात. त्यासाठी 9011050005 या मोबाईल फोन नंबर संपर्क साधावा अथवा [email protected] वर ई-मेल पाठवावा.

""

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.