मोहनगरमध्ये पैसे वाटप केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमीपीसी न्यूज – मतदारांची यादी व मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्स हातामध्ये घेऊन मतदारांना पैसे वाटणा-या चौघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.18) सायंकाळी सातच्या सुमारास मोहननगर येथे करण्यात आली. 

भगवान सदाशिव नामदे (वय 38, मोहननगर, चिंचवड), दादा पाटील (वय 45, रा. रामनगर, चिंचवड) व आणखी यांच्या दोन साथीदारांवर कलम 171 (ब), 171 (ई) 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजू बापू वेताळ (वय 48, रा. वाकड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत. प्रभाग क्रमांक 14 येथील मातृ-छाया निवासामध्ये शनिवारी सायंकाळी नामदे व पाटील पैसे वाटत असल्याची माहिती वेताळ यांना मिळाली. त्यानुसार वेताळ आणि पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी  घराची झडती घेतली. भांड्याच्या किचन ट्रॉलीमध्ये दोन हजार रुपयांच्या 72 नोटा, पाचशेची एक नोट असे एक लाख 44 हजार 500 रुपयांची रोकड सापडली. तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील काही मतरांची यादी व मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्स, प्रभाग 10 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे प्रचारपत्रक आणि प्रभाग 14 मधील भाजपच्या उमेदवाराची प्रचारपत्रके मिळून आली आहेत. पिंपरी ठाण्याचे फौजदार एच. एस. बोचरे तपास करत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.