शनिवार, डिसेंबर 3, 2022

च-होली-मोशी प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पदयात्रा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या च-होली-मोशी प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम रामचंद्र खेडकर (अ), मंदा उत्तम आल्हाट (ब), विनया प्रदीप (आबा) तापकीर (क), संजय संतुराम पठारे (ड) यांनी आज (रविवारी) प्रभागात पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने प्रचारफेरीत सहभागी झाले होते. 

वाघेश्वर मंदिर पायथ्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली. भोसले वस्ती, कोतवाल वस्ती, साठेनगर, वाघेश्वरवाडी, वेताळ बुवा चौक या मार्गे ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत महिला, अबाववृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

प्रदीप तापकीर, हरीभाऊ सस्ते, गणेश कुदऴे, प्रवीण कुदळे, बाळासाहेब बनकर, माणिक बनकर, उत्तम आल्हाट, बच्चन रासकर, वामण कुदळे, रामदास कुदळे, अविनाश कुदळे, राजू गायकवाड, शरद आल्हाट, संजय हजारे, तानाजी हजारे, आप्पासाहेब भोसले, प्रवीण काळजे, संतोष बुर्डे, रोहिदास काटे तसेच अनिल तापकीर, माऊली रासकर, चंद्रकांत बुर्डे, कांताराम बुर्डे, दत्तु बुर्डे, विठ्ठल रासकर, नामदेव रासकर, प्रकाश पठारे, राघु पठारे, राजाराम पठारे, पांडुरंग पठारे, राहुल भोसले, महादू पठारे, बाळासाहेब भोरे, सुरेखा तापकीर, जयश्री लांडगे, कल्पना आल्हाट तसेच कल्याणी कुदळे, सरुबाई कुदळे, संगीता कुदळे, भाऊसाहेब गिलबिले, नवनाथ तापकीर, चंद्रकांत तापकीर, हिरामण सस्ते, गणेश सस्ते, राजू सस्ते सहभागी झाले होते.

प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे चारही उमेदवारांनी विकासा साथ देण्याचे आवाहन, नागरिकांना केले.
Latest news
Related news