पुणे महापालिकेत कमळ; राष्ट्रवादीने सत्ता गमावली

भाजप 98 जागांवर विजयी

भाजप गटनेता गणेश बिडकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा पराभव

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट राज्यातील महापालिका निवडणुकीमध्ये देखील कायम असल्याचे पाहावयास मिळाले. या निवडणुकीत 162 जागांपैकी 98 जागी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस 40, काँग्रेस 11, शिवसेना 10, मनसे 2 आणि एमआयएम 1 जागाने खाते उघडले. तर भाजपच्या लाटेमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला असून त्यामध्ये दस्तूरखुद्द भाजपचे गटनेता गणेश बिडकर आणि मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागल्याने शहरात एकच चर्चा ऐकण्यास मिळाली.  


पुणे महानगपालिकेची यंदाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या दरम्यान अनेकांनी आमची सत्ता महापालिकेवर येणार, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, मोदींची लाट महापालिका निवडणुकीमध्ये देखील कायम असल्याचे पाहावयास मिळाले. त्याचबरोबर निवडणुका जाहीर झाल्यानंतर सभांच्या काळात एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याने नागरिक कोणाला मतदान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मतदार राजाने भाजपवर विश्वास दाखवित महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहे. परंतु या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का देण्याचे काम मतदार राजाने केला आहे.

त्यामध्ये खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाने विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे,  स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि नगरसेवक राजू पवार यांचा पराभव केला. सभागृह नेते बंडू केमसे मनसेचे गटनेते अॅड. किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ या विद्यमान पदाधिकार्‍यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. यामध्ये भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांचा काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा पराभव केला.    

प्रभाग क्र. 10 मधून एकमेकांच्या समोरा-समोर उभे असलेल्या सभागृह नेते बंडु केमसे आणि मनसेचे गटनेते अॅड. किशोर शिंदे यांचा भाजपच्या किरण दगडे या उमेदवारांनी पराभव केला. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, राष्ट्रवादीचे नगरसेवक विनायक हनमघर यांच्यावर भाजपच्या महेश लडकत यांनी पराभव केला. तसेच प्रभाग क्रमांक 18 मधून सर्वसाधारण जागेवरून लढविणार्‍या पहिल्या महिला महापौर विद्यमान नगरसेविका कमल व्यवहारे यांचा भाजपमध्ये अखेरच्या क्षणी येऊन उमेदवारी मिळविणार्‍या सम्राट थोरात यांनी पराभव केला.

सहकारनगर-पद्ममावती या प्रभाग क्र. 35 मध्ये माजी सभागृह नेते सुभाष जगताप, व शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार्‍या नगरसेवक शिवलाल भोसले यांचाही भाजपच्या महेश वाबळे यांनी पराभव केला. वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक या प्रभाग क्र. 33 मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक विकास दांगट यांच्यावर भाजपचे राजाभाऊ लायगुडे यांनी विजय मिळविला.

       
शिवसेना शहर प्रमुखांच्या चिरंजीव सनी निम्हण यांचा देखील पराभव

शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांचे चिरंजीव नगरसेवक सनी निम्हण यांना देखील या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्याने शिवसैनिकांमध्ये एक वेगळीच चर्चा ऐकण्यास मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.