निवडणुकीत कोणाचे काम केले असे विचारत तिघांची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकीत कोणाचे काम करत होता आणि गाडी वेडीवाकडी का चालवतोस, असे म्हणत तिघांनी एका तरुणाला लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना आज (शनिवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाकड येथे घडली.

 

या प्रकरणी तेजस गंगाराम देवकर (वय 32), चंद्रकांत भाऊसाहेब देवकर (वय 50, दोघे रा. देवकर वस्ती, वाकड) आणि विनोद हनुमंत वाकडकर (वय 36, रा. वाकडवस्ती, वाकड) यांच्याविरोधात कलम 324, 144, 341, 142, 143, 144, 146, 147, 148, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय तानाजी कलाटे (वय 20, रा. कलाटे वस्ती, वाकड) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

अक्षय हा वाकड येथून जात होता. त्यावेळी आलेल्या तेजस, विनोद आणि चंद्रकांत या तिघांनी महापालिका निवडणुकीत तू कोणाचे काम करत होता आणि गाडी वेडीवाकडी का चालवतोस, असे म्हणत अक्षय याला लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण केली, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.