तारुण्यपिटिका आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार मार्गदर्शन शिबिर

एमपीसी न्यूज –  डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पवना इंडस्ट्रीजजवळ, पिंपरी, पुणे येथे दि. 27 फेब्रुवारी ते मार्च दरम्यान कायाचिकित्सा विभागाच्या वतीने मुखदूषिका अर्थात तारुण्यपिटिका या आजारावर मोफत तपासणी तसेच औषधोपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दु 4 यावेळेत ओ.पी.डी 5 मध्ये शिबिर घेण्यात येईल.

 

त्वचा हे पंचज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. सुंदर व नितळ त्वचे मुळे व्यक्तिमत्त्व सुधारते तसेच व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वास्थावर विशेष प्रभाव पडतो. आजकालच्या जीवनशैलीतील बदलामुळे जसे की, फास्ट फूड, बेकारीचे पदार्थ विरुद्ध आहार, रात्री जागरण, वारंवार कामाचा ताण, अवेळी जेवण यामुळे त्वचाविकारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्वचाविकारांमध्ये मुखदूषिक म्हणजे पिंपल्स याचा समावेश होतो. यामध्ये चेहऱ्यावर पुरळ उठणे, काळे डाग पडणे, पुरळांमधून पाणी वाहणे पु येणे, खाज येणे, आग होणे, वेदना होणे, अशा प्रकारची लक्षणे सतावत असतात. या प्रकारांच्या विकारांवर मोफत तपासणी तसेच औषधोपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या शिबिरासाठी  जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. स्नेहा डांगे 7841916679 जनसंपर्क अधिकारी मयूर देशमुख 9763616306 भारती मराठे 9921737277 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.