डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्यानमाला व परिसंवाद कार्यक्रम

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने सोमवारी (दि. 27) आणि मंगळवारी (दि.28) बहिःशाल शिक्षण मंडळ योजने अंतर्गत व्याख्यानमाला/ परिसंवाद शिबिराचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आले आहे.

 

यामध्ये सोमवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत ‘महिला सबलीकरण – सक्षमीकरण’ या विषयावर समाजप्रबोधनकार शारदा मुंडे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच दुपारी 2 ते 3 या वेळेत ‘कुपोषण एक समस्या व उपाय’ या विषयी माण येथील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. बालाजी लकडे यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवारी सकाळी 11 ते 12 वेळेत ‘संसर्ग नियंत्रण उपाययोजना’ या विषयी नेहा कांजूरकर (बी. व्ही. जी ग्रुप) यांचे व्याख्यान तर दुपारी 2 ते 3 वेळेत ‘वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन’ याविषयी डॉ. पद्‌मनाभ केसकर (रुबी हॉल क्लिनिक, पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे.

 

शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान सामाजिक मूल्यांचे जतन व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबरोबर संवाद कौशल्य वाढीस लागावे, तसेच समाज नवनिर्मितीच्या कामात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने व्याख्यानमाला व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे यांनी सांगितले.

 

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी मयूर देशमुख 9763616306 भारती मराठे 9921737277 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.