सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

तळेगावमध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग करून लुबाडणारा चोरटा गजाआड

 एमपीसी न्यूज – घरात घुसून महिलेचा विनयभंग आणि मारहाण करत गळ्यातील एक तोळ्याचे गंठन चोरुन नेणा-या आरोपीला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सहा तासाच्या आत गजाआड केले. ही घटना शुक्रवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास तळेगावजवळ वराळे येथे घडली.

संतोष मोतीलाल ठाकूर (वय 34, रा. शिव कॉलनी, वराळे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 21 वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास एकट्याच घरी होत्या. त्यावेळी आरोपी संतोष याने त्यांच्या घराचा दरावाजा वाजवला. त्यांनी दरवाजा उघडला असता आरोपी संतोष घरामध्ये घुसला. त्याने फिर्यादी यांच्याशी मनाला लज्जा उत्पन होईल, असे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

फिर्यादीच्या हातातील स्टीलच्या हुकने गळ्याला ओरखडले. त्यांना शयनगृहात ओढत नेऊन डोके भिंतीवर आदळले आणि मारहाण केली. तसेच गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण चोरुन गॅलरीतून उडी मारुन पळून गेला होता. 

 

तळेगाव एमआयडीसी पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला सापळा रचून सहा तासाच्या आत गजाआड केले. आरोपी संतोष हा काही कामधंदा करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे फौजदार विक्रम पासलकर तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news