हिंजवडीत कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी दुचाकी आणि यंत्रामध्ये वापरले जाणारे पिस्टलचे 1 हजार 216 नग, असा 5 लाख 26 हजार 528 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 27) मध्यरात्री जांबे येथे घडली.

 

याप्रकरणी सुभांकर माटे (वय 21, रा. टिळक रोड, पुणे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माटे याची जांबे येथे मेनन पिस्टल या नावाने कंपनी आहे. कंपनीमध्ये दुचाकी आणि यंत्रामध्ये वापरले जाणारे पिस्टल तयार केले जातात. कंपनीच्या बाजूलाच त्यांचे गोडावून आहे. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे तो गोडाऊन बंद करून गेला होता.

 

मध्यरात्री गोडाऊनचे शटर उचकटून चोरटे आतमध्ये घुसले. पिस्टलचे 1 हजार 216 नग असा 5 लाख 26 हजार 528 रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी माटे कंपनीत आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. हिंजवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. जे. धामणे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.