शनिवार, डिसेंबर 3, 2022

ताथवडेत पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचारी तरुणाच्या हातातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.28) रात्री सव्वादहाच्या सुमारास ताथवडे येथे घडली.

 

याप्रकरणी नहुष सगर (वय 26    , रा. ताथवडे) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नहुष मंगळवारी रात्री ताथवडे येथून मोबाईल फोनवर बोलत चालला जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्याकडील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून चोरून नेला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Latest news
Related news