सातवीत शिकणारा सराईत चोरटा पुन्हा पोलिसांच्या ताब्यात; दोन दुचाकींसह चार मोबाईल हस्तगत

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलिसांनी 8 फेब्रुवारी रोजीच चोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास पुन्हा एकदा चोरी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून 2 दुचाकी आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 

सिंहगड पोलीस गस्त घालत असताना संबंधित विद्यार्थी होंडा अॅक्टिव्हा दुचाकीने भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पुन्हा 2 दुचाकी आणि 4 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. या विद्यार्थ्यांकडून एकाच महिन्यात चोरीच्या 3 दुचाकी व 8 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

 

आरोपीने आज जप्त केलेल्या दुचाकीपैकी एक दुचाकी धायरीतील सर्व्हिसिंग सेंटरमधून चोरली तर दुसरी वडगाव येथील उमा हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्यून चोरल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.