वाकड येथील टेरेसवर फुलविलेल्या धुमाळांच्या सफरचंद बागेची आंध्राच्या वंडर बुकमध्ये नोंद

टेरेसवर फुलविली सफरचंदाची बाग 

एमपीसी न्यूज –  वाकड येथील नंदकुमार धुमाळ यांच्या सफरचंद टेरेस गार्डनच्या विक्रमाची आंध्र प्रदेशातील वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतीच नोंद करण्यात आली आहे. 

संस्थेच्या वतीने देण्यात येणा-या रेकॉर्ड प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफीचे शिवसेनेचे शहर प्रमुख व  नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी वाकड ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे, सहायक निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग, नितीन लोंढे, एस. पी. स्कुलचे संस्थापक अंकुश बोडके, ब्लॅक पँथर पार्टीचे मेहबूब शेख, काळुराम धुमाळ, बबन धुमाळ, सुनिल कुचेकर आदी उपस्थित होते. 

 
शासन स्तरावर या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात यावे तसेच धुमाळ यांना त्यांच्या नावाने पेटंट मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कलाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 
हिमालया सारख्या थंड हवेच्या ठिकाणी येणारे सफरचंदाचे झाड धुमाळ यांनी मोठ्या मेहनतीने परसबागेत जगवले हे केवळ जगलेच नसून त्याला दर सहा महिन्याला कसदार फळे देखील येतात. गेल्या सतरा वर्षांपासून धुमाळ यावर प्रयोग करीत आहेत. पुढे त्यांनी गुटी कलमाद्वारे थेट टेरेसवरच सफरचंदाची बाग फुलविली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.